आनंदाची आणि अभिमानाची बातमी
आपल्या ठाणे जिल्ह्याची ज्यूदोपटू
कुमारी अपूर्वा महेश पाटील
यांना राज्य शासनाचा खेळाडू गटातील उच्चतम पुरस्कार
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
जाहिर झालेला आहे.
वर्ष 2022-23 या वर्षासाठी छाननी केल्या गेलेल्या अर्जातून कु. अपूर्वा गुणवत्तेच्या निकषांवर सर्वश्रेष्ठ ठरली आहे.
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्यूदो स्पर्धांमध्ये राज्याचा डंका वजविणाऱ्या अपूर्वांस या अभिमानास्पद पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहे.
अपूर्वाचे वडील पोलीस खात्यात कार्यरत असून तिच्या मातोश्री गृहिणी आहेत.
ठाण्याचे जुन्या पिढीतील ज्यूदो प्रशिक्षक श्री देवीसिंह राजपूत यांच्याकडे अपूर्वाने ज्यूदोचे धडे गिरवण्यांस प्रारंभ केला आणि कालांतराने ती खेळातील सातत्य, अखंड परिश्रम,
अजोड चिकाटी आणि दृढ महत्वाकांक्षा बाळगत या मानाची मानकरी झालेली आहे.
कुमारी अपूर्वच्या या यशाबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे.
महाज्यूदो परिवारातर्फे कुमारी अपूर्वा हिचे खूपखूप कौतुक, अभिनंदन आणि पुढील अमर्याद यशासाठी शुभेच्छा!
अपूर्वाचे पालक, प्रशिक्षक आणि ठाणे जिल्हा ज्यूदो यांचा तिच्या यशात मोठा वाटा आहे म्हणून आम्ही सर्वजण या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.
Students Achievement
Rohini Mohite Gold Medal in Asia cup 2018 at Makau |
Shraddha Chopade Bronze Medal in Asian Cadet Judo Championship 2022 at Bangkok, Thailand |